Chinchwad: एकतर्फी निवडणूक झाली चुरशीची; लक्ष्मण जगताप यांचा 40 हजारांनी विजय

20 हजारांनी मताधिक्य घटले; जगताप यांना नाराजी भोवली?,  अपक्ष राहुल कलाटे यांनी दिली कडवी झुंज

एमपीसी न्यूज – स्वत:ची ताकद, शिवसेना-भाजपची पारंपरिक मते, भाजपचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची  राबणारी फौज ही सर्व जमेची बाजू असल्याने चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना एकतर्फी वाटणारी चुरशीची झाली. जगताप 40 हजार मतांच्या फरकाने  विजयी झाले असून त्यांनी हॅटट्रिक केली आहे. तर, पराभव झाला असला तरी अपक्ष राहुल कलाटे यांनी कडवी झुंज दिली. पहिल्याफेरीपासून कलाटे आणि जगताप यांच्यात काटे की टक्कर झाली. दरम्यान, जगताप यांचे 20 हजाराने मताधिक्य घेतले असून त्यांना नागरिकांची नाराजी भोवल्याची चर्चा सुरू झाली आहे.

चिंचवड  विधानसभा मतदारसंघ राज्यातील दोन नंबरचा मोठा मतदारसंघ आहे. चिंचवडमध्ये दोन लाख 76 हजार 927 पुरुष आणि दोन लाख 41 हजार 980 महिला आणि इतर 32 असे एकूण पाच लाख 18 हजार 309 मतदार आहेत. त्यापैकी एक लाख 54 हजार 550 पुरुष आणि एक लाख 23 हजार 198 महिला आणि इतर एक अशा दोन लाख 77 हजार 750 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे.  53.59 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

पहिल्या फेरीपासून लक्ष्मण जगताप  आणि राहुल कलाटे यांच्यात काटे की टक्कर होती. जगताप तर कधी कलाटे आघाडी घेत होते. परंतु, 16 व्या फेरीपासून जगताप यांचे मताधिक्य वाढत गेले. 22 व्या फेरीपर्यंत जगताप यांनी 40 हजारांचे मताधिक्य घेत विजय मिळविला आहे मात्र त्यांचे  मोठे मताधिक्य मिळण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.  पोस्टल मतांमध्ये जगताप यांना 235 आणि कलाटे यांना 231 मते मिळाली आहेत.

पहिल्या फेरीत राहुल कलाटे आघाडीवर होते. त्यांनतर सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये जगताप आणि कलाटे समान मतांनी टक्कर देत होते. मात्र,  तिसऱ्या फेरीनंतर जगताप यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. तिसऱ्या फेरीत जगताप यांना 6201 तर कलाटे यांना 5790 मते मिळाली. चौथ्या फेरीत जगताप यांनी 26 हजार 13 मतांनी आघाडी घेतली. यांनतर  6 फेऱ्यांमध्ये जगताप 9 हजार मताधिक्याने पुढे होते. तर, दहा फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर जगताप यांनी दहा हजार मतांनी आघाडी घेतली. सर्व फेऱ्यांमध्ये कलाटे यांनी दिली जोरदार टक्कर दिली

16 वी फेरी झाल्यानंतर जगताप यांना एक लाख 17 हजार 283 मते मिळाली. तर कलाटे यांना 86 हजार 551मते मिळाली. या 16 फेऱ्यांमध्ये जगताप यांनी   30 हजार 732 मतांची आघाडी घेतली. 18 व्या फेरीअखेर पुन्हा टफ फाईट पहायला मिळाली. या फेरीअखेर जगताप  यांच्या पारड्यात एक लाख 22 हजार 50 मते तर कलाटे यांनी  एकूण 91 हजार 857 मते घेतली. जगताप हे  30 हजार 199 मतांनी आघाडीवर होते. अखेरीस जगताप यांचा 40 हजार मतांच्या फरकाने विजय झाला.

जगताप यांचे मताधिक्य घटले!
चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीची मोठी ताकद आहे. त्यामुळे लक्ष्मण जगताप यांचा एक लाख ते दील लाखाच्या फरकाने विजय होईल असे दावे केले जात होते. 2014 च्या निवडणुकीत जगताप 60 हजार मताच्या फरकाने विजयी झाले होते. यावेळी युती आणि नगरसेवकांचे संख्याबळ पाठिशी असतानाही जगताप यांचे मताधिक्य घटले आहे. 40 हजार मताच्या फरकाने जगताप यांचा विजय झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.