Chinchwad : जलतरण तलावातील पाच फूट खोल पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – जलतरण तलावात पोहायला शिकत असलेल्या तरुणाचा पाच फूट खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 17) सायंकाळी सातच्या सुमारास थेरगाव येथील महापालिकेच्या कांतीलाल खिंवसरा नरसिंग पाटील जलतरण तलावात घडली.

वैभव अंचल जैन (वय 23, रा. वाकड. मूळ रा. पंजाब) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव हा संगणक अभियंता असून तो हिंजवडी येथील ‘कॉग्निझेन्ट’ या आयटी कंपनीत नोकरीला होता. वैभव शनिवारी सायंकाळी थेरगाव येथील महापालिकेच्या कांतीलाल खिंवसरा नरसिंह पाटील या जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला होता. दरम्यान, तो पोहत असताना अचानक तळाशी जाऊ लागला. यावेळी जीवरक्षक सतीश कदम आणि नितेश कलापुरे यांनी तत्काळ त्याला बाहेर काढले. पाण्याबाहेर येताच वैभवने उलटी केली व त्यानंतर तो निपचित पडला. जीवरक्षकांनी वैभवला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.