Chinchwad : बंद पडलेल्या पॉलिसीचे पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने पावणेसात लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – बंद पडलेल्या पॉलिसीचे पैसे मिळवून देतो, असे सांगून एकाकडून 6 लाख 82 हजार 10 रुपये घेऊन फसवणूक केली. हा प्रकार 28 मे 2018 ते 31 जानेवारी 2019 या कालावधीत घडली.

अनिल रामा पाटील (वय 36, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल यांनी एका कंपनीकडून पॉलिसी घेतली. त्यांच्या व्यक्तिगत कारणांमुळे ती पॉलिसी बंद पडली. पॉलिसी चालू केल्यास कालांतराने त्यांना त्यातून चांगली रक्कम मिळणार होती. दरम्यान, त्यांना दोन ते तीन जणांनी मिळून सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करून बंद पडलेल्या पॉलिसीचे पैसे मिळवून देतो, असे सांगत अनिल यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यावर 6 लाख 82 हजार 10 रुपये घेतले. लाखो रुपये घेऊन देखील आरोपींनी अनिल यांच्या पॉलिसीचे पैसे मिळवून न देता फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.