BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : उघड्या डीपी बॉक्समुळे नागरिकांचा जीव धोक्यात

75
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- पिंपरी चिंचवड शहरातील उघड्या डीपी बॉक्समुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

इंदिरा गांधी उड्डाणपुलावरून मोरवाडीच्या दिशेला उतरणाऱ्या ठिकाणी महावितरणचा डीपी उघडा पडला असून या ठिकाणाहून जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. चिंचवड पिंपरी लिंक रस्त्यावरील मदर तेरेसा उड्डाण पुलाखालील महावितरणचा डीपी बॉक्स झाला फुलदाणी झाला आहे. हा बॉक्स झुडपांनी भरून गेला आहे. रामकृष्ण मोरे सभागृहासमोर उघड्या पडलेल्या डीपी समोर दुचाक्या उभ्या केल्या जात असल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

महावितरणचे अधिकारी याकडे लक्ष देतील का ? असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.