Chinchwad : ‘अपना वतन’च्या वतीने प्रकाश मेहता यांच्या राजीनामा मागणीसाठी निदर्शने

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री भाजपचे नेते प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यच्या मागणीसाठी अपना वतन संघटनेच्या वतीने आज (दि. १५ जून) पिंपरी चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रकाश मेहता,राजीनामा द्या, ‘पुरे शहर मी बजाओ डंका, भ्रष्टाचार कि जलाओ लंका’, ‘जनता कि है ललकार, बंद करो भ्रष्टचार’ अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी अपना वतन संघटनेचे राजश्री शिरवळकर ,हेमलता परमार ,निर्मला डांगे ,आरती कोळी ,बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या नेत्या अनिता साळवे ,राजू शेरे ,हमीद शेख ,अब्दुल शेख ,दिलीप देहाडे ,संतोष कदम, ऍड मोहन अडसूळ, गिरीश वाघमारे, सतीश काळे ,फारुख शेख ,शाहरुख खान ,भारत मिरपागरे, फ्रान्सिस गजभिव ,डेव्हिड काळे ,डॅनियल सोनकर ,शकील सय्यद ,प्रदीप गायकवाड ,लक्ष्मण पांचाळ ,तौफिक पठाण ,विशाल निर्मल ,दिवेश पिंगळे, चांद सय्यद, मायकल नाडर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

  • ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी पिंपरी चिंचवड पालिकेतील भ्रष्टचाराबाबत सत्तधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला .शहरातील भ्रष्टाचारबाबत मोठे जनआंदोलन उभे करण्याची सूचना केली. तसेच संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी सांगितले कि, प्रकाश मेहता, सुभाष देशमुख, पंकजा मुंडे, विनोद तावडे, राम शिंदे, संभाजी पाटील निलंगेकर, सुभाष देसाई, गिरीश बापट यांसारख्या अर्ध्या डझनपेक्षा जास्त मंत्र्यांवर विविध प्रकरणामध्ये भ्रष्टचाराचे आरोप झाले. त्यामुळे प्रकाश मेहता यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

भाजपचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दक्षिण मुंबईतील इमारत पुनर्विकास योजनेत विकासकाचा मोठय़ा प्रमाणावर फायदा होईल, अशा पद्धतीने मेहता यांनी निर्णय घेतला होता, असा आरोप त्यांच्यावर झाला होता .दोन वर्षांपूर्वी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांनी आवाज उठविल्यावर या आरोपाची लोकायुक्तांकडून चौकशीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार लोकायुक्त निवृत्त न्यायमूर्ती एम. एल. टहलीयानी यांनी चौकशी पूर्ण झाल्यावर गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.

  • त्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे कि, दक्षिण मुंबईतील इमारत पुनर्विकास योजनेत विकासकाचा मोठय़ा प्रमाणावर फायदा होईल अशा पद्धतीने मेहता यांनी निर्णय घेतला होता.तसेच ‘फाईलवर मुख्यमंत्र्यांना अवगत केले आहे’ असा शेरा मारला होता. झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविताना विकासकाला झुकते माप देण्यात आले होते. मेहता यांनी विकासकाचा फायदा होईल अशा पद्धतीने निर्णय घेतला होता. मेहता यांची निर्णय प्रक्रिया स्वच्छ आणि प्रामाणिक नव्हती, असे ताशेरे देखील त्यांनी ओढले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.