Chinchwad : विद्यार्थी आणि शिक्षकांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन पाहण्याची संधी

एमपीसी न्यूज – नामवंत चित्रकार सुधीर बांगर व मनीषा बांगर यांनी आयोजित केलेल्या व विद्यार्थी आणि शिक्षक यांनी काढलेल्या निवडक चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी (दि. 18) एमपीसी न्यूजचे संपादक विवेक इनामदार यांच्या हस्ते चिंचवड येथे पार पडले. सॉफ्ट पेस्टल, ऑइल पेस्टल, वॉटर कला, ऑइल कलर, ऍक्रेलिक कलर, ऑन कॅनव्हास अशा विविध माध्यमात काढलेली चित्रे पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

चापेकर चौक चिंचवड येथील पु. ना. गाडगीळ कलादालनात हे प्रदर्शन भरविण्यात आले असून लहान मुलांसून ते मोठ्या चित्रकारानीं काढलेली वेगवेगळ्या विषयांवरील चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. हे प्रदर्शन रविवार (दि.23) पर्यंत रसिकांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे.

उद्घाटन प्रसंगी चित्रकार जितेंद्र जाधव, चित्रकार घोडके इतर मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते. विवेक इनामदार यांनी विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे कौतुक केले तसेच सुधीर बांगर करत असलेल्या कामासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

बांगर म्हणाले, “कोणतीही कला निर्मिती ही मानसिकतेवर अवलंबून असते आणि त्यासाठी वातावरण निर्मिती गरजेची असते आम्ही त्यासाठी विशेष प्रयत्न करत असतो आणि मुलांना कलानिर्मितीला प्रोत्साहन देतो”

महाविद्यालयीन चित्रकार शुभम भोंडवे आणि शिवानी परबकर यांचा लक्षवेधी चित्रानिमित्त सत्कार करण्यात आला. या प्रदर्शनात राधा खंडागळे, आस्मी गुप्ता, पावनी गोयल, प्रगती सोंजे, कौस्तुभ राऊत, सिद्धी शर्मा,चेतन मिंडे , अनुश्री नायर, नितांत इसकांडे, तेजस अहिरे, श्रुती आव्हाळे, तनीश्क मोरे,शर्वरी कोंढे, समीक्षा चौधरी,आर्या बेलवलकर, खुशी चौधरी, उदय फडतरे, जुई एरंडे, तन्वी हिरोदिया, कुश देवरे, ओम नेमाडे, अर्थव नेमाडे या चित्रकारांची चित्रे मांडण्यात आली आहेत. चित्र रसिकांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.