Chinchwad : महाशिवरात्रीनिमित्त महाशिबिरात रुग्णांची तपासणी; भाविकांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज – महाशिवरात्री निमित्ताने धनेश्वर मंदिर चिंचवड येथे येणाऱ्या सर्व भाविकांसाठी पिंपरी-चिंचवड शहर केमिस्ट असोसिएशनच्या वतीने महाशिबिर आय़ोजित केले होते. यावेळी रुग्णांची तपासणी करण्यात आली.

या शिबिराचे उदघाटन सामाजिक महिला कार्यकर्त्या कविता खिवंसरा, महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष संतोष खिवंसरा व वर्धन खिवंसरा, सौरभ शिंदे, मदन चौधरी, प्रांजळ पाटील, राहुल शेडगे, अशोक शिंगाडे, मुकुंद गुरव, आदी उपस्थित होते.

  • या शिबिरात युरिक ऍसिड, स्किन मॉंइसरींग, रक्तदान शिबिर, हाडाचा ठीसुलपणा, कॅलसीयम, अस्थमा, बिपी आदी आजारांवर शिबिर आयोजित केले होते. सामाजिक महिला कार्यकर्त्या कविता खिवंसरा, महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांच्या हस्ते सकाळी शिबिराचे उद्धाटन करण्यात आले.

या शिबिरात अडीच हजार पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला. तसेच भाविकांनी स्वतःहून रक्तदान केले. अनेक मान्यवरांनी शिबिरास उपस्थिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.