Chinchwad : पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डने जेतेपद राखले

 एमपीसी न्यूज : गतविजेता पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (Chinchwad) संघाने हॉकी महाराष्ट्र आयोजित चौथ्या हॉकी इंडिया पुरुष आंतरविभाग राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद राखले. चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने मेजर ध्यानचंद स्टेडियम, नेहरूनगर-पिंपरी येथे झालेल्या अंतिम फेरीत रविवारी  त्यांनी गतउपविजेता रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (आरएसपीबी) संघाचा पेनल्टी शूटआउटवर 3-2(1-1) असा पराभव करताना पुन्हा ट्रॉफी उंचावली.

पीएसपीबी आणि आरएसपीबी सलग दुसर्‍यावर्षी आमनेसामने असल्याने अंतिम फेरीची रंगत कायम होती. निर्धारित दोन्ही संघांनी सर्व आघाड्यांवर चांगला खेळ केला. दर्शन गावकरने (11वे) रेल्वे बोर्डाला पहिल्या क्वार्टरमध्ये आघाडीवर नेले. मात्र, सामना संपायला एक मिनिट शिल्लक असताना तलविंदर सिंगने (59 वे) पेट्रोलियम बोर्डाला बरोबरी साधून दिली.

निर्धारित वेळेत 1-1 अशी बरोबरी राहिल्याने पेनल्टी शूटआउटचा अवलंब करून विजेता ठरवण्यात आला. त्यात गतविजेता पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड संघाने 3-2 अशी बाजी मारली. त्यांच्याकडून सुमीत कुमार, शिलानंद लाक्रा तसेच कर्णधार देविंदर वाल्मिकीने गोल गेले. तलविंदर सिंग आणि विक्रमजीत सिंगची पेनल्टी वाया गेली.

प्रतिस्पर्धी रेल्वे बोर्डाकडून शिवम आनंद, दर्शन गावकर यांनाच गोल करता आले. सिमरनजोत सिंग, कर्णधार (Chinchwad) युवराज वाल्मिकी तसेच गुरसबजीत सिंगला गोल करण्यात अपयश आले. गोलकीपर पंकज कुमारने तिघांच्या पेनल्टी अडवत पेट्रोलियम बोर्डाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. 2023मध्ये बंगळूरूममध्ये झालेल्या तिसर्‍या आंतर-विभाग राष्ट्रीय स्पर्धेत आरएसपीबीला हरवत पीएसपीबीने जेतेपद पटकावले होते.

तत्पूर्वी,  तिसर्‍या क्रमांकाच्या लढतीत, सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड (एसएससी) संघाने फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) संघाला 4-0 अशा मोठ्या फरकाने हरवले. चारही गोल उत्तरार्धात झाले. सुशील धनवर (33वे आणि 41वे – पीसी) आणि हरमन सिंग (35वे, 47वे) यांचे प्रत्येकी दोन गोल त्यात महत्वपूर्ण ठरले. चारही गोल 17 मिनिटांच्या फरकाने झाले.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे (एमओए) सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांच्या हस्ते बक्षीस समारंभ झाला. यावेळी फोर्स वन महाराष्ट्र पोलीसचे एडीजी हॉकी महाराष्ट्रचे अध्यक्ष कृष्ण प्रकाश (आयपीएस), हॉकी महाराष्ट्रचे सचिव मनीष आनंद आणि वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज भोरे यांची प्रमुख उपस्थिती होती..

निकाल:
अंतिम सामना: पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (पीएसपीबी):1(3)(तलविंदर सिंग 59 वे) विजयी वि. रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (आरएसपीबी):1(2)(दर्शन गावकर 11वे). मध्यंतर: 0-1.

तिसर्‍या क्रमांकाची लढत: सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड (एसएससी): 4(सुशील धनवर 33वे-पीसी, 41वे-पीसी; हरमन सिंग (35वे, 47वे) विजयी वि. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय):0. मध्यंतर: 0-0.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share