Chinchwad : चिंचवड काँग्रेस कमिटीच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

एमपीसी न्यूज – मराठी पत्रकार दिनानिमित्त चिंचवड विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील कर्तृत्ववान पत्रकारांचा आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आला.

पिंपरी येथे झालेल्या या कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे, सज्जी वर्की, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ, शैलेश आनंतराव, परशुराम गुंजाळ, युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयूर जैयस्वाल, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे चिंचवड विधानसभा अध्यक्ष संदेश बोर्डे, चंद्रशेखर जाधव, स्नेहल गायकवाड, अमोल करडक, गौरव चौधरी आदी उपस्थित होते.

यावेळी एमपीसी न्यूजच्या पत्रकार लीना माने, बाळासाहेब ढसाळ, मिलिंद कांबळे, तुषार रंधवे, गणेश हुंबे, संदेश पुजारी, जुबेर खान, शबनम सय्यद, रेहान सय्यद, बाबू कांबळे, प्रदीप लोखंडे, आकाश मोरे आदींना गौरविण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.