Chinchwad : पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचा कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नाही – सुदेश राजे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा जाहीर करण्यात आलेला नाही. काही माध्यमांमधून पाठिंबा जाहीर केल्याचे सांगण्यात आले आहे, मात्र फेडरेशनने कोणताही पाठिंबा दिलेला नाही. अशी माहिती पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष सुदेश राजे यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनकडून एका विशिष्ट राजकीय पक्षाला पाठिंबा जाहीर केल्याचे वृत्त काही माध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात आले. या वृत्तामध्ये काहीही तथ्य नसल्याचे फेडरेशनचे अध्यक्ष सुदेश राजे यांनी सांगितले. फेडरेशनचा राजकारणाशी दूरदूरपर्यंत संबंध नाही विशिष्ट संस्थांच्या माध्यमातून सोसायट्यांचे प्रश्न मार्गी लावले जातात. त्याबाबत सर्व सोसायटी यांच्या वतीने संबंधितांचे आभार. मात्र, सोसायट्यांमध्ये कामे केल्यामुळे त्यांचा पाठिंबा मिळाला असल्याचे जाहीर करणे चुकीचे आहे. फेडरेशनच्या वतीने जाहीररीत्या कोणत्याही पक्षाला अथवा उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला नसल्याचे सुदेश राजे यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.