BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

0
INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्य दिन आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यामध्ये रेकॉर्डवरील 376 सराईत गुन्हेगारांचा शोध घेतला. त्यातील 170 रेकॉर्डवरील गुन्हेगार शहरात मिळून आले. मिळालेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्यदिन आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत रविवारी (दि. 11) रात्री बारा ते पहाटे पाच या कालावधीत ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील एकूण 376 सराईत गुन्हेगार, पाहिजे आणि फरारी असलेल्या आरोपींचा त्यांच्या घरी आणि परिसरात शोध घेतला.

  • चेक केलेल्या आरोपींपैकी 170 रेकॉर्डवरील आरोपी मिळून आले. यामध्ये निगडी पोलीस ठाण्यातील एनडीपीएस कायद्यान्वे कारवाई केलेला आरोपी भरत ज्ञानोबा थोरात मिळून आला.

देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी संदीप दादू खलसे, चिखली पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी अनिकेत रणदिवे आणि मयूर चव्हाण मिळून आले. या सर्वांना अटक करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

HB_POST_END_FTR-A2

.