Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सोमवारी 92 जणांवर कारवाई

Pimpri-Chinchwad police on Monday took action against 92 people

एमपीसी न्यूज – प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सोमवारी (दि. 15) शहरातील 92 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे पिंपरी चिंचवड शहरात संचारबंदी, जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास पोलिसांकडून नागरिकांवर कारवाई केली जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा वाढत आहे. मंगळवारी (दि. 16) दुपारी दीड वाजेपर्यंत शहरात 27 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. २ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात आजवर 1 हजार 324 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 770 जण बरे झाले आहेत. तर 22 जणांचा मृत्यू झाला आहे. 533 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

सोमवारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार भोसरी एमआयडीसी (10), भोसरी (0), पिंपरी (8), चिंचवड (18), निगडी (0), आळंदी (0), चाकण (0), दिघी (1), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (0), वाकड (28), हिंजवडी (10), देहूरोड (2), तळेगाव दाभाडे (3), तळेगाव एमआयडीसी (4), चिखली (8), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (0) अशा एकूण 92 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

मागील दहा दिवसात दीड हजार जणांवर कारवाई

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दहा दिवसात एक हजार 518 जणांवर प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. दररोज सरासरी 150 लोकांवर कारवाई केली जात आहे.

कारवाई केलेली आकडेवारी

6 जून – 152
7 जून – 173
8 जून – 168
9 जून – 163
10 जून – 118
11 जून – 129
12 जून – 143
13 जून – 151
14 जून – 229
15 जून –

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.