Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून मंगळवारी 43 जणांवर कारवाई

Pimpri-Chinchwad police on Tuesday took action against 43 people

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मंगळवारी (दि. 23) प्रशासनाच्या आदेशाचे पालन न केल्याबाबत 43 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

शहरात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. बुधवारी दुपारी दोन वाजेपर्यंत शहरात 79 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 45 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाचे शहरात 2 हजार 117 रुग्ण झाले असून ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 835 एवढी आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.

शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न करणा-यांवर या पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

मुंबई जुगार कायद्यान्वये सांगवी आणि चिखली पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये वाकड पोलीस ठाण्यात एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मंगळवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार एमआयडीसी भोसरी (1), भोसरी (0), पिंपरी (0), चिंचवड (0), निगडी (0), आळंदी (0), चाकण (0), दिघी (2), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (1), वाकड (5), हिंजवडी (21), देहूरोड (5), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (5), रावेत चौकी (3), शिरगाव चौकी (0) अशा एकूण 43 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.