Chinchwad: पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून बुधवारी 110 जणांवर कारवाई

Chinchwad: Pimpri-Chinchwad police on Wednesday took action against 110 people who violets rule प्रशासनाने लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता आणली आहे. मात्र रात्रीच्यावेळी संचारबंदी कायम ठेवली आहे.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात प्रशासनाच्या आदेशचे उल्लंघन केल्याप्रकरणी बुधवारी (दि.14) 110 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बाधितांचा आकडा अकराशेवर गेला आहे. प्रशासनाने लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता आणली आहे. मात्र रात्रीच्यावेळी संचारबंदी कायम ठेवली आहे.

तसेच मास्क लावून सार्वजनिक ठिकाणी जाणे, दुचाकीवर एक तर रिक्षात व चारचाकी वाहनात चालकासह तीन जणांना प्रवास करण्यास परवागनी दिलेली आहे.

मात्र नागरिकांकडून प्रशासनाने दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळ पोलिसांची कारवाई अद्यापही अद्यापही सुरूच आहे.

बुधवारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार भोसरी एमआयडीसी (1), भोसरी (1), पिंपरी (10), चिंचवड (10), निगडी (6), आळंदी (1), चाकण (0), दिघी (5), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (0), वाकड (28), हिंजवडी (30), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (3), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (10), रावेत चौकी (5), शिरगाव चौकी (0) अशा एकूण 110 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.