Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून बुधवारी 256 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बुधवारी (दि. 21) शहरातील 256 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली.

सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, तसेच गर्दी न करणे असे नियम प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहेत. नागरिकांकडून जर हे नियम पाळले जात नसतील, तर अशा नागरिकांवर आर्थिक दंडात्मक कारवाई करणे, गुन्हे दाखल करण्याची देखील प्रशासनाकडून तरतूद करण्यात आली आहे.

बुधवारी पिंपरी-चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात 256 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बुधवारी केलेली कारवाई –

एमआयडीसी भोसरी (4), भोसरी (12), पिंपरी (9), चिंचवड (12), निगडी (24), आळंदी (24), चाकण (0), दिघी (7), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (44), वाकड (75), हिंजवडी (9), देहूरोड (11), तळेगाव दाभाडे (1), तळेगाव एमआयडीसी (2), चिखली (7), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (15)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III