Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून बुधवारी 63 जणांवर कारवाई

Pimpri-Chinchwad police on Wednesday took action against 63 people

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बुधवारी (दि. 24) प्रशासनाच्या आदेशाचे पालन न केल्याबाबत 63 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

शहरात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.

शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न करणा-यांवर या पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये चिखली पोलीस ठाण्यात दोन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

बुधवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार एमआयडीसी भोसरी (0), भोसरी (0), पिंपरी (0), चिंचवड (8), निगडी (0), आळंदी (0), चाकण (0), दिघी (0), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (18), वाकड (2), हिंजवडी (26), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (2), चिखली (7), रावेत चौकी (3), शिरगाव चौकी (0) अशा एकूण 63 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.