Chinchwad crime News : प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 193 जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून कारवाई

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली जात आहे.

एमपीसी न्यूज – कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. बुधवारी (दि. 9) पिंपरी चिंचवड पोलिसांनी 193 जणांवर कारवाई करत त्यांच्यावर खटले दाखल केले आहेत.

कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढल्याने अधिक काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदी, जमावबंदीच्या आदेशाची पोलीस अंमलबजावणी करीत आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली जात आहे.

बुधवारी पिंपरी चिंचवड शहरात 1 हजार 240 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर शहरातील आजवरचा कोरोना बधितांचा आकडा 58 हजार 747 वर पोहोचला आहे.

बुधवारी पोलिसांनी केलेली कारवाई 

एमआयडीसी भोसरी (2), भोसरी (9), पिंपरी (5), चिंचवड (4), निगडी (11), आळंदी (2), चाकण (0), दिघी (0), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (21), वाकड (2), हिंजवडी (32), देहूरोड (5), तळेगाव दाभाडे (10), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (76), रावेत चौकी (4), शिरगाव चौकी (9)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.