Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलिसांकडून आणखी 244 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलिसांनी मंगळवारी (दि. 12) 244 जणांवर कारवाई केली. लॉकडाऊनच्या कालावधीत प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पोलिसांकडून ही कारवाई अविरत सुरू आहे.

17 मे पर्यंत देशभरात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा असणार आहे. त्यानंतर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात होणार असल्याचे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून यात संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. यानुसार नागरिकांच्या अत्यावश्यक कामाशिवाय फिरण्यावर बंधने आली आहेत.

मंगळवारी पिंपरी चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे एमआयडीसी भोसरी (16), भोसरी (10), पिंपरी (20), चिंचवड (56), निगडी (31), आळंदी (0), चाकण (1), दिघी (26), म्हाळुंगे चौकी (6), सांगवी (8), वाकड (10), हिंजवडी (14), देहूरोड (13), तळेगाव दाभाडे (3), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (25), रावेत चौकी (4), शिरगाव चौकी (1) अशा एकूण 244 जणांवर कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.