Chinchwad: पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून शनिवारी 100 जणांवर कारवाई

Chinchwad: Pimpri-Chinchwad police took action against 100 people on Saturday for violating rules of lockdown लॉकडाऊनचे नियम शिथिल करताना काही निर्बंध देखील प्रशासनाकडून घालण्यात आले आहेत. त्या निर्बंधांचे उल्लंघन केल्यास पोलीस नागरिकांवर कारवाई करीत आहेत.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड पोलिसांनी प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शनिवारी (दि. 20) 100 जणांवर कारवाई केली. शहरात कोरोनाचा कहर वाढत असून नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडत आहेत. त्यांच्याकडून प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्यास पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी तब्बल 124 कोरोनाचे रुग्ण आढळले. शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात प्रशासनाने लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता दिली आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या संखेने घराबाहेर पडत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी पोषक स्थिती निर्माण होत आहे.

लॉकडाऊनचे नियम शिथिल करताना काही निर्बंध देखील प्रशासनाकडून घालण्यात आले आहेत. त्या निर्बंधांचे उल्लंघन केल्यास पोलीस नागरिकांवर कारवाई करीत आहेत.

कोरोनाशी लढा सबंध जगभर सुरु असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन वेळोवेळी प्रशासनाकडून केले जात आहे.

शनिवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार एमआयडीसी भोसरी (0), भोसरी (16), पिंपरी (4), चिंचवड (10), निगडी (1), आळंदी (0), चाकण (0), दिघी (5), म्हाळुंगे चौकी (2), सांगवी (9), वाकड (4), हिंजवडी (38), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (2), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (9), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (0) अशा एकूण 100 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.