Chinchwad : पिंपरी चिंचवड हादरले !, शहरात आज दोघांची आत्महत्या; दोन दिवसांत पाच जणांनी संपवले जीवन

Pimpri-Chinchwad trembled! Two committed suicide in the city today, Five people lost their lives in two days

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड आणि सांगवी परिसरात शुक्रवारी (दि. 19) दोन जणांनी आत्महत्या केली. दरम्यान, गुरुवारी शहरात तिघांनी आत्महत्या केली होती. सलग दोन दिवसांत एकूण पाच जणांनी आत्महत्या केल्याने पिंपरी चिंचवड शहर हादरून गेले आहे.

शुक्रवारची पहिली घटना दळवीनगर, चिंचवड येथे घडली. प्रतिक मनोहर कडव (वय 30, रा. दळवीनगर, चिंचवड मूळगाव ता. पाटण, सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

चिंचवडचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक हा शहरातील एका बड्या कंपनीत कंत्राटी तत्वावर काम करीत होता. महिन्याभरापूर्वी प्रतिक याचे लग्न झाले होते. तो पंधरा दिवसांपूर्वीच पुन्हा नोकरीसाठी शहरात आला होता.

प्रतीकची पत्नी मूळगावी आहे. प्रतिक त्याच्या मित्रासोबत चिंचवड येथे राहत होता. त्याने आज दुपारी रूमचा दरवाजा आतून लावून घेतला होता. त्याचा मित्र घरी आला तेव्हा दार आतून बंद होते. त्यामुळे पोलिसांना बोलावून दरवाजा तोडला तेव्हा प्रतिक याने गळफास घेतल्याचे उघड झाले.

_MPC_DIR_MPU_II

प्रतीकने लग्नानंतर अवघ्या काही दिवसात गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

दुसरी घटना पिंपळेगुरव येथे दुपारी उघडकीस आली. प्रतिक कचरू कोकणे (वय 30, रा. गंगोत्रीनगर, पिंपळेगुरव) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

सांगवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक कोकणे हा त्याच्या आईसह गंगोत्रीनगर येथे राहत होता. त्याने दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान गळफास लावून आत्महत्या केली. प्रतीकच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

गुरुवारी शहरात तिघांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. तर पोलिसांनी वेळीच पोहचून एकाला आत्महत्येपासून परावृत्त केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा शहरात दोघांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1