BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : तारांगणच्या विस्तारीकरणाचे काम दीड वर्षात पूर्ण होणार

पावणे तीन कोटी खर्च; दुस-या टप्प्यासाठी निविदा

0 165
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथे उभारलेल्या तारांगण प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी निविदा काढली आहे. येत्या दीड वर्षात हे काम पूर्ण केले जाणार आहे. दोन ठिकाणी आसन व्यवस्था तयार करण्याबरोबरच घुमटाचे काम केले जाणार आहे. यासाठी दोन कोटी 72 लाख 42 हजार 886 रुपये खर्चाची निविदा काढली आहे.

.

चिंचवड येथील सायन्स पार्क येथे ‘तांरागण’ प्रकल्प करण्यात येत असून त्यामध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. टुडी – ऑप्टो मेकॅनिकल यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यासाठी येणा-या नऊ कोटी 73 लाख रूपये खर्चाला स्थायी समितीने यापूर्वीच मान्यता दिली. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी व्यवस्थापन सल्लागार म्हणून पी. के. दास ऍण्ड असोसिएशनची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी सल्लागाराला प्रकल्प किमतीच्या 1.35 टक्के शुल्क देण्यात आले आहे. अंतराळ क्षेत्रात शहरातील विद्यार्थ्यांनी स्थान निर्माण करावे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभागही मोलाचा असावा, या उद्देशाने महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील सायन्स पार्कमध्ये तारांगण उभारण्यात येत आहे. या तारांगणात 150 बैठक व्यवस्था असून 105 बैठक व्यवस्थेचे स्वतंत्र सभागृह आहे.

याशिवाय, पुस्तक दालनाचेही नियोजन आहे. या तारांगणावर 15 मीटर व्यासाचे व गोलाकार घुमट असून त्याचा सांगाडा लोखंडी आहे. त्यावर आधुनिक काचेचे आवरण बसवण्यात येणार आहे. यामध्ये डीजिटल स्वरूपाचे तारांगण दाखवले जाणार आहे. पूर्ण लतामंडप उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत सर्व ग्रह, तारे, नक्षत्र पहावयास मिळणार आहेत. विविध लहान मोठे तारे तसेच ध्रुवतारा, नक्षत्र स्पष्टपणे पाहता येणार आहेत. त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणांचा अवलंब करण्यात येणार आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यात केला जाणार आहे. टप्पा एकमध्ये स्थापत्य आणि विद्युत विषयांचा तर टप्पा दोनमध्ये तारांगणासाठी आवश्‍यक प्रोजेक्‍टर, आतील डोम आदी कामांचा समावेश आहे.

चिंचवड येथील सायन्स पार्क येथे उभारण्यात येत असलेल्या तारांगण प्रकल्प इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास आले असून त्यात अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. टुडी – ऑप्टो मेकॅनिकल यंत्रणा बसविणे, त्याची देखभाल – दुरुस्ती आणि प्रशिक्षित मनुष्यबळासह संचलन करणे आदी कामांसाठी आंतरराष्ट्रीय कंपनीला ठेका देण्यात आला आहे. या कामाचे बिलही अमेरिकन चलन (डॉलर) मध्ये देण्यात आले आहे. पाच वर्षांच्या या कामासाठी गोटोइन्क प्लॅनेटेरियम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 14 लाख 30 हजार अमेरिकन डॉलर म्हणजेच नऊ कोटी 73 लाख रूपये दिले जाणार आहेत. तसेच देखभाल, दुरूस्तीसाठी 80 लाख रूपये देण्यात आले आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: