Chinchwad : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या 30 व्या वाढदिवसानिमित्त 30 वृक्षांचे रोपण

Chinchwad: Planting of 30 trees on the occasion of Environment Minister Aditya Thackeray's 30th birthday पर्यावरण रक्षणासाठी वृक्षांचे अच्छादन महत्त्वाचे - श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज – राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या 30 व्या वाढदिवसानिमित्त चिंचवड येथे शिवसेनेच्या वतीने 30 देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले.

वृक्षारोपणासाठी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, पिंपरी-चिंचवड युवा सेवा प्रमुख विश्वजित बारणे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, नगरसेवक सचिन भोसले, अनंत को-हाळे आदी उपस्थित होते.

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा शनिवारी (दि. 13 जून) 30 वा वाढदिवस शिवसेना, युवा सेनेच्या वतीने ठिकठिकाणी विविध उपक्रमांमधून आणि नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला. पिंपरी-चिंचवडमध्ये देखील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.मंत्री आदित्य ठाकरे यांचा 30 वा वाढदिवस असल्याने 30 देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले.

चिंचवड येथील पवना नदीच्या काठावर आणि थेरगाव येथे मोरया गोसावी मंदिराच्या जवळ रस्त्याच्या बाजूला हे वृक्षारोपण करण्यात आले आहे.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “वृक्ष पर्यावरणात मिसळलेले विषारी वायू शोषून त्यातून मानवी आरोग्याला पूरक वायू पर्यावरणात सोडतात. त्यासाठी वृक्षारोपण करून वृक्षांचे आच्छादन करणे खूप महत्वाचे आहे. पर्यावरण स्वच्छ ठेवण्याची आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.