BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : प्लॅस्टिक पिशव्या वापराविरोधातील कारवाई सुरुच; 29 हजार 200 रुपये प्रशासकीय दंड वसूल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्लॅस्टिक पिशव्या वापरांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे सलग तीन दिवसांतीलग क्षत्रिय कार्यालय प्रभाग क्रमांक 24 बिर्ला हॉस्पिटल चिंचवड, डांगे चौक, वाकड रोडवर ही कारवाई करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत कारवाई करण्यात आली असून एकूण 29 हजार 200 रुपये प्रशासकीय दंड वसूल करण्यात आला .

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने प्लॅस्टिकविरोधातील कारवाई जोरात सुरु केली आहे. चिंचवड येथील डांगे चौक, बिर्ला हॉस्पिटल, वाकड रोड याठिकाणी केली. प्रभाग अधिकारी स्मिता झगडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी संजय कुलकर्णी, मुख्य आरोग्य निरीक्षक राजीव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक शांताराम माने व कर्मचारी स्वदेश साळुंखे ,अरुण राऊत, प्रशांत पवार यांनी केली

‘ग’ क्षत्रिय कार्यालय प्रभाग क्रमांक 24 यामध्ये चार दुकानदारांवर प्लॅस्टिक वापरल्यामुळे प्रत्येकी 5000 हजार रुपये व मंडईमध्ये व स्वच्छतेबाबत 4700 रुपये दंड तसेच दुकानांतील साहित्य रोडवर ठेवण्याबाबत एका दुकानदाराला 3000 हजार रुपये दंड व कचरा रोडवर टाकने कामी दोन दुकानदारांवर 1500 रुपये दंड करण्यात आला, असे एकूण मिळून 29 हजार 200 रुपये प्रशासकीय दंड वसूल करण्यात आला.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3