Chinchwad : खेळाडूंना ॲकॅडमिक प्रशिक्षणाची गरज-आमदार गौतम चाबुकस्वार 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात अर्जुन, छत्रपती, द्रोणाचार्य आदी पुरस्कार व पदके विजेते खेळाडू आहेत. त्यांच्या अनुभवांचा वापर नव्या खेळाडूंनी करण्याची गरज आहे. खेळाडूंना ॲकॅडमिक प्रशिक्षणाची गरज असल्याचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी म्हटले आहे.

लिंकरोड येथील गोलांडे इस्टेट भागातील हिंदवी प्रतिष्ठान या संस्थेला आमदार निधीमधून कबड्डी मॅट लोकार्पण सोहळा कार्यक्रम झाला. खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते ही मॅट देऊन या प्रशिक्षण केंद्राचे उद्‌घाटन झाले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, नगरसेवक प्रमोद कुटे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, हिंदवी प्रतिष्ठानचे उमेश गोलांडे, पद्मश्री पुरस्कार विजेते मुरलीकांत पेटकर, शिवसेना संघटिका ऊर्मिला काळभोर, रोमी संधू आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.