BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : धुलवडीच्या रंगाचा बेरंग करणा-या 291 हुल्लडबाजांवर पोलिसांची कारवाई

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – रस्त्याने जाणा-या नागरिक, तरुण, तरुणी आणि महिलांच्या अंगावर जाणीवपूर्वक विनाकारण रंग अथवा रंगाचे फुगे टाकणा-या तरुणांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नऊ पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकूण 291 जणांवर कारवाई केली.

सार्वजनिक रस्त्यांवर तसेच चौकांमध्ये थांबून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर रंगाचे फुगे टाकणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिले. त्यानुसार आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी पथके तैनात करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या 291 जणांचा धुळवडीचा सण त्यांच्या हुल्लडबाजीमुळे पोलीस ठाण्यात गेला आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 68 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

 • ताब्यात घेतलेल्या हुल्लडबाजांची आकडेवारी –
  वाकड – 87
  निगडी – 35
  भोसरी – 42
  चिखली – 07
  दिघी – 16
  सांगवी – 06
  हिंजवडी – 04
  चिंचवड – 12
  देहूरोड -19
  भोसरी एमआयडीसी – 43
  पिंपरी – 13
  गुन्हे शाखा युनिट एक – 07
.

HB_POST_END_FTR-A1
.