Chinchwad : नववर्षाच्या पूर्वसंध्येला 202 तळीरामांवर पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – नववर्षाच्या पूर्वसंध्येला मद्यप्राशन करून वाहने चालवणा-या 202 तळीरामांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे. या मद्यपींच्या नवीन वर्षाचे स्वागत पोलिसांच्या कारवाईने झाले आहे.

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला होता. मद्य पिऊन वाहने चालवणा-या संशयित वाहनचालकांची पोलिसांनी ब्रीद ऑनालायजरच्या साहाय्याने तपासणी केली. त्यामध्ये दोषी आढळणा-या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

मद्यप्राशन करून वाहने चालवणे स्वतःच्या आणि इतरांच्या धोक्याचे आहे. सर्वाधिक कारवाई भोसरी वाहतूक विभागाच्या हद्दीत करण्यात आली. तर चाकण वाहतूक विभागात सर्वात कमी मद्य पिऊन वाहन चालवणारे तळीराम पोलिसांना सापडले आहेत.

मद्यप्राशन करून वाहन चालविल्यास पोलिसांकडून न्यायालयात खटला दाखल करण्यात येतो. आरोपींना सुमारे 2 हजार 500 रुपयांचा दंड होऊ शकतो. तसेच वाहनचालकाचा परवाना किमान तीन महिन्यांसाठी रद्द होऊ शकतो. वाहनचालकावर एखाद्या कलमाची वाढ केल्यास दंडामध्ये वाढ देखील होऊ शकते. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या कारवाईमध्ये 202 तळीरामांवर यावर्षी खटले दाखल करण्यात आले आहेत. मागील वर्षी हा आकडा 127 होता.

  • वाहतूक विभाग आणि कारवाईंची संख्या –
    # सांगवी – 18
    # हिंजवडी – 18
    # निगडी – 26
    # पिंपरी – 27
    # भोसरी – 36
    # चिंचवड – 21
    # चाकण – 06
    # दिघी-आळंदी – 11
    # देहूरोड-तळेगाव – 23
    # तळवडे – 16

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.