Chinchwad : धुळवडीच्या रंगाचा बेरंग करणारे 143 जण पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर रंग टाकणे, रंगाने भरलेले फुगे अथवा प्लास्टीक पिशव्या मारणे, महिलांच्या इच्छेविरोधात रंग लावणे, दारू पिऊन गोंधळ घालत धुळवडीच्या रंगाचा बेरंग करणा-या 143 जणांना पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
धुळवडीच्या रंगाचा बेरंग करत तापदायक ठरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करीत त्यांना ताब्यात घेतात. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करतात. गेल्यावर्षी वाकड पोलीस ठाण्याचे तात्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी अशा प्रकारची कारवाई केली होती. त्यानंतर माजी पोलीस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांनी आपल्याला अशाच प्रकारची कारवाई अपेक्षित असल्याचे सांगितले.
यामुळे इतर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी अवघ्या दोन तासात हुल्लडबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली. यंदाच्या वर्षीही चिखलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी हुल्लडबाजांवर कारवाई करण्यात आघाडी घेतली. यंदाच्या वर्षी त्यांनी तब्बल 35 जणांवर कारवाई करीत आघाडी घेतली आहे.

 

पोलीस ठाणे व कारवाई केलेल्यांची संख्या
वाकड 08
सांगवी 05
हिंजवडी 11
भोसरी 17
पिंपरी 12
चिंचवड 10
निगडी 09
चिखली 35
एमआयडीसी भोसरी 28
दिघी 08
एकूण – 143 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.