Chinchwad : गणेशोत्सवाच्या माध्यमांतून माणसातील वाईट प्रवृत्तींचा नाश व्हावा – स्मार्तना पाटील

एमपीसी न्यूज – गणेशोत्सवाच्या माध्यमातून माणसातील वाईट प्रवृत्तींचा नाश व्हावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी चिंचवड येथे केले. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत चिंचवड पोलीस स्टेशन आयोजित मोरया गणेशोत्सव पुरस्कार 2018 चे वितरण करताना स्मार्तना पाटील बोलत होत्या.

यावेळी टाटा मोटर्सचे वरिष्ठ व्यवस्थापक (मनुष्यबळ) सतीश मोटे, चिंचवड पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे, सांगवी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, गुन्हे शाखा निरीक्षक विश्वजित घुले, मोरया पुरस्कार समिती अध्यक्ष सुभाष मालुसरे, नगरसेवक सुरेश भोईर, नगरसेविका अश्विनी चिंचवडे उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते गांधीपेठ तालीम मित्रमंडळाला गणेशोत्सव स्पर्धा 2018 च्या मोरया फिरता करंडकाने सन्मानित करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांनी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत या पुरस्काराचा स्वीकार केला.

स्मार्तना पाटील म्हणाल्या, “भारतात तरुणांची संख्या जास्त आहे. जगातील सर्वेक्षणानुसार 2035 सालापर्यंत भारत हा जगातील सर्वात तरुण देश म्हणून अग्रस्थानी राहील, ही जशी आनंदाची बातमी आहे, तशी काळजी करण्याची बाब आहे. कारण अल्पवयीन गुन्हेगारांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून तरुणाईला जर सकारात्मक आणि विधायक मार्गाकडे वळवले तर समाजातील मानवी दुष्प्रवृत्ती नष्ट होतील. यासाठी पोलीस खाते पूर्णपणे सहकार्य देण्यास तयार आहे”

_MPC_DIR_MPU_II

पुरस्कारांचा तपशील खालीलप्रमाणे –

फिरता मोरया करंडक (कै. बाळासाहेब दिनकर भोईर स्मृतिप्रीत्यर्थ) – गांधीपेठ तालीम मित्रमंडळ, आदर्श गणेशोत्सव (देखावा).

प्रथम क्रमांक : एस.के.एफ.कंपनी
द्वितीय क्रमांक : गांधीपेठ तालीम मित्रमंडळ
तृतीय क्रमांक : लक्ष्मीनगर सार्वजनिक मित्रमंडळ
उत्तेजनार्थ : चिंतामणी मित्रमंडळ, वाल्हेकरवाडी

आदर्श विसर्जन मिरवणूक
प्रथम क्रमांक : गांधीपेठ तालीम मित्रमंडळ
द्वितीय क्रमांक : संत ज्ञानेश्वर मित्रमंडळ
तृतीय क्रमांक : उत्कृष्ट मित्रमंडळ
उत्तेजनार्थ : समता मित्रमंडळ.

या प्रसंगी परीक्षक आणि प्रायोजक यांचा सत्कार करण्यात आला. धनंजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. स्मिता दुसाणे, निर्मला जगताप, नीलेश सायकर, मधुकर साठे, राजू जैन, चंद्रकांत लुणावत यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात परिश्रम घेतले. विजय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सतीश भारती यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.