Chinchwad : नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा

रविवारी 357 जणांवर भादंवि 188 प्रमाणे गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी रविवारी (दि. 18) शहरातील 357 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार गुन्हे दाखल केले आहेत.

कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. पुढील दोन ते तीन महिन्यात कोरोना आटोक्यात येणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, तसेच गर्दी न करणे असे नियम प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहेत. नागरिकांकडून जर हे नियम पाळले जात नसतील, तर अशा नागरिकांवर आर्थिक दंडात्मक कारवाई करणे, गुन्हे दाखल करण्याची देखील प्रशासनाकडून सोय करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या सुरक्षेसाठी नियम पाळणे आवश्यक आहे.

रविवारी पिंपरी-चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात 357 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईने मागील आठवड्यापासून आणखी जोर धरला आहे. आठवड्यापूर्वी हा आकडा 100 च्या आसपास असायचा, मात्र आता 300 ते 400 च्या जवळपास नागरिकांवर दररोज कारवाई केली जात आहे.

रविवारी केलेली कारवाई –

एमआयडीसी भोसरी (28), भोसरी (25), पिंपरी (25), चिंचवड (34), निगडी (13), आळंदी (14), चाकण (2), दिघी (4), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (20), वाकड (110), हिंजवडी (28), देहूरोड (33), तळेगाव दाभाडे (10), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (3), रावेत चौकी (8), शिरगाव चौकी (0)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III