Chinchwad : अपहरण झालेल्या बारा वर्षीय मुलीची पोलिसांनी केली बारा तासात सुखरूप सुटका

एमपीसी न्यूज – चिंचवड स्टेशन परिसरातून भरदिवसा अपहरण झालेल्या मुलीची पोलिसांनी बारा तासात सुखरूप सुटका केली. ही घटना गुरुवारी (दि. 15) दुपारी चारच्या सुमारास घडली.

माही अवध जैन (वय 12) असे सुखरूप सुटका झालेल्या मुलीचे नाव आहे.

माही चिंचवड मधील क्विन्स टाऊन सोसायटीमध्ये राहते. त्यांचा परिवार मूळ जयपूर मधील आहे. ते आधी निगडी येथे राहायचे. मागील तीन वर्षांपूर्वी जैन परिवार चिंचवड मधील क्विन्स टाऊन सोसायटीत राहायला आले. तिचे वडील आयटी क्षेत्रात तर आई बँकेत काम करतात. माही नेहमीप्रमाणे दुपारी चार वाजता शाळेतून घरी आली. शाळेच्या स्कूलबस मधून सोसायटीच्या गेटवर उतरली. त्यानंतर पेन आणण्यासाठी ती सोसायटी जवळ असलेल्या माय मार्ट या दुकानात गेली. तिथे कार मध्ये दबा धरून बसलेल्या आरोपींनी तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. माहीने आरडाओरडा केला. हा आरडा ओरडा पाहून दुकानदार बाहेर आला. तोपर्यंत कार सुसाट गेली.

दुकानदाराने मोपेड दुचाकीवरून कारचा पाठलाग केला परंतु थोडे अंतर गेल्यानंतर कार गायब झाली. दुकानदाराने याबाबत माहीच्या घरी कळवले. घरचे बाहेर आले. त्यांनी पोलिसांना कळवले. आणि संपूर्ण पोलीस प्रशासन माहीच्या शोधासाठी अलर्ट झाले. रात्री आठच्या सुमारास माहीच्या वडिलांच्या मोबाईलवर अपहरण कर्त्यांनी पैशांच्या मागणीसाठी फोन केला. यावरून पोलिसांना अपहरणकर्त्यांचा सुगावा लागला. त्यांचे लोकेशन ट्रॅक करत तांत्रिक तपास करत पोलिसांनी आज पहाटे ४ वाजता दोन जणांना मारुंजी परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून माहीची सुखरूप सुटका केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.