Chinchwad : पिंपरी चिंचवड मधील 13 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 13 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी याबाबतचे आदेश आज, सोमवारी (दि. 27) दिले आहेत.

नऊ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्या आहेत. तर दोन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या त्यांच्या विनंतीवरून करण्यात आल्या आहेत. तर देवराम चव्हाण यांची वैद्यकीय कारणास्तव नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांची निगडी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक (गुन्हे) पदावर बदली करण्यात आली आहे.

बदली झालेले पोलीस निरीक्षक (कुठून / कुठे)

# शंकर बाबर (पिंपरी ते गुन्हे शाखा युनिट तीन ते अतिरिक्त कार्यभार एमओबी)
# राजकुमार शिंदे (चिखली ते वाहतूक शाखा)
# मिलिंद वाघमारे (नियंत्रण कक्ष ते पिंपरी)
# सतीश माने (वाकड ते चिखली)
# विवेक मुगळीकर (गुन्हे शाखा युनिट तीन ते वाकड)
# राजेंद्र राजमाने (वाकड गुन्हे ते रावेत चौकी)
# गणेश जवादवाड (चिखली गुन्हे ते निगडी)
# राजेंद्र निकाळजे (निगडी गुन्हे ते पिंपरी गुन्हे)
# शहाजी पवार (संगणक विभाग ते तळेगाव दाभाडे गुन्हे)
# अरुण ओंबासे (भोसरी वाहतूक ते निगडी वाहतूक)
# शिवाजी गवारे (आळंदी वाहतूक ते भोसरी वाहतूक)
# देवराम चव्हाण (भोसरी गुन्हे ते नियंत्रण कक्ष)
# सुनील टोणपे (निगडी ते निगडी गुन्हे)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.