Chinchwad : पोलीस मित्र परिवाराकडून चिंचवड पोलीसांना “रायट पोलीस गियर ” चे सुरक्षा कवच

एमपीसी न्यूज- वाढत्या शहरीकरणामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या विस्ताराबरोबर संघटित गुन्हेगारीही फोफावत आहे. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या हेतूने पोलीस मित्र परिवार तसेंच मधुराज इंटरप्रायजेसच्या वतीने चिंचवड पोलीस ठाण्यास 3 बॉडी रायट गियर हे सुरक्षा पोषाख भेट देण्यात आले.

या प्रसंगी चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गणेश आठवे, सहा. पोलीस उपनिरीक्षक डी. जी.कांबळे, ज्येष्ठ पोलीस मित्र सुभाष मालुसरे, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील, कार्याध्यक्ष गोपाळ बिरारी, महिला अध्यक्ष अर्चना घाळी-दाभोळकर, बाबासाहेब घाळी उपस्थित होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे म्हणाले,” उत्सव असो किंवा पालखी सोहळा पोलीस मित्र परिवाराचे सदस्य हे सामाजिक संस्था वा सुरक्षा समितीच्या माध्यमातून पोलीस यंत्रणेला मोलाची साथ देत आले आहेत. अनेक वर्षांपासून हा मित्र परिवार, एसपीओ नागरिक तसेच पोलिस कर्मचारी यांच्या सुरक्षेकरिता दक्ष असतो. आज मिळालेल्या ह्या सुरक्षा पोषाखामुळे दंगलग्रस्त परिस्थितीत पोलीस कर्मचारी नक्कीच सुरक्षित असेल”

राजेंद्र वाघ म्हणाले,” दंगलग्रस्त परिस्थितीमध्ये सदरच्या सुटचा उपयोग मोलाचा ठरतो. गतीने फेकून मारलेल्या वस्तूंपासून संपूर्ण शरिराचे “रायट पोलीस गियर” मुळे रक्षण होते. उच्चक्षमतेच्या अभियांत्रिकी प्लास्टिक पासून सदरच्या सुटची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे सदरचा ड्रेस हलका बनलेला आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.