Chinchwad : कोरोनाचा संशयित रूग्ण आढल्यास नागरिकांमध्ये घबराट पसरू देऊ नका; पोलिसांनाही सूचना

एमपीसी न्यूज – आपल्या परिसरात करोनाचा संशयित रूग्ण आढल्यास नागरिकांमध्ये घबराट पसरू देऊ नका. याबाबत आरोग्य विभागाशी संपर्क साधून त्यांना ही माहिती द्या, असे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

 

करोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला आहे. या विषाणूने भारतातही प्रवेश केला आहे. पुण्यात कोरोना बधितांची संख्या आठवर पोहोचली आहे. यामुळे पोलिसांनीही योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

 

करोना विषाणूने भारतातच नव्हे तर पुणे शहरातही शिरकाव केला आहे. बुधवारी देहूरोड येथे एकाच कुटुंबातील सहाजण संशयित सापडले. त्यांच्या चाचण्या घेण्यासाठी तात्काळ पुण्यातील नायडू रुग्णालयात भरती करण्यात आले. चाचणी अहवालात त्यांना बाधा न झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. पोलिसांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.

 

पोलिसांच्या भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांना हस्तोदलन करू नका. त्यापेक्षा भारतीय संस्कृतीप्रमाणे दोन्ही हात जोडून नमस्कार करा. वेळच्यावेळी हात धुवावेत. गर्दीच्या ठिकाणी गेल्यावर तोंडावर मास्क लावा व इतरांनाही मास्क लावण्याबाबतच्या सूचना द्या, अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.