BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : सात सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक यांची पुणे पोलीस आयुक्तालयात बदली

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात बदल्यांचे वारे वाहू लागले आहे. त्यातच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातून सात सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एक पोलीस उपनिरीक्षक अशी एकूण आठ अधिका-यांची पुणे पोलीस आयुक्तालयात प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस दलात नव्याने दाखल झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांची तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली आहे.

बदली झालेले अधिकारी आणि पोलीस ठाणे –
सहाय्यक पोलीस निरीक्षक नकुल सिद्राप्पा न्यामणे (हिंजवडी)
सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका दामोदर सरग (सांगवी)
सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जयसिंग धामणे (हिंजवडी)
सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश दत्ता वाघमारे (पिंपरी)
सहाय्यक पोलीस निरीक्षक जगन्नाथ महादेव बनसोडे (निगडी)
सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर पांडुरंग सूर्यवंशी (चाकण)
सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू रामचंद्र ठुबल (एमआयडीसी भोसरी)
पोलीस उपनिरीक्षक नंदराज तुकाराम गभाले (हिंजवडी)

HB_POST_END_FTR-A4

.