Chinchwad Crime News : पिंपरी, देहूरोड येथील जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

आठ जणांवर गुन्हा दाखल, 35 हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने पिंपरी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारला. तर देहूरोड पोलिसांनी देहूरोड परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर कारवाई केली. या दोन्ही कारवायांमध्ये आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 35 हजार 670 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सामाजिक सुरक्षा पथकाने पिंपरीमधील स्वर्गीय चेतनदास मेवानी सभागृहाच्या समोर सुरू असलेल्या कल्याण मटका नावाच्या जुगार अड्ड्यावर सोमवारी दुपारी सव्वा चार वाजताच्या सुमारास छापा मारला. यामध्ये पोलिसांनी चार हजार 700 रुपये रोख रक्कम, नऊ हजार 500 रुपयांचे दोन मोबाईल फोन आणि दहा रुपयांचे मटका खेळण्याचे साहित्य, असा 14 हजार 210 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

देहूरोड पोलिसांनी विठ्ठलवाडी देहूगाव येथे सुरु असलेल्या 27 पानी नावाच्या जुगार अड्ड्यावर छापा मारला. या कारवाईमध्ये सहा हजार 900 रुपये रोख रक्कम, 14 हजार रुपयांचे मोबाईल फोन, 560 रुपयांचे जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण 21 हजार 460 रुपयांचा ऐवज जप्त केला. तसेच तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.