Chinchwad : लॉकडाऊनमध्ये विविध प्रतिबंधात्मक कारवायांमध्ये पोलिसांकडून 2 कोटी 65 लाखांचा मुद्देमाल जप्त

Police seized of property Rs 2.65 crore in various preventive operations in the lockdown

एमपीसी न्यूज – प्रतिबंधित मालाची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणे, गुटखा, अमली पदार्थ बाळगणे आणि त्याची विक्री करणे, जुगार खेळणे यांसारख्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी तब्बल 2 कोटी 65 लाख 75 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलिसांनी लॉकडाऊनच्या काळात केली आहे.

शासनाने मनाई केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यात 534 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यात 392 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 2 कोटी 18 लाख 40 हजार 850 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

जुगार खेळल्याप्रकरणी 51 गुन्हे दाखल करत 144 जणांना अटक केली आहे. त्यात 3 लाख 83 हजार 681 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

अवैध गुटखा बाळगणे, विक्री आणि वाहतूक केल्याबाबत 14 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 20 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 36 लाख 71 हजार 519 रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.

अवैध तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या 12 जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 लाख 54 हजार 260 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या 13 जणांवर गुन्हे दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. 5 लाख 25 हजार 200 रुपयांचे 15 हजार 970 ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थांचा मुद्देमाल पोलिसांनी या 13 जणांकडून जप्त केला आहे.

लॉकडाऊनच्या काळात दुकाने सुरू ठेवणे, खासगी व व्यापारी वाहन चालविणे, सामाजिक अंतर न पाळणा-या 30 हजार 821 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर मास्क न घालणाऱ्या 6 हजार 664 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.

5 हजार 102 वाहने पोलिसांनी लॉकडाऊनच्या काळात जप्त केली. त्यामध्ये दुचाकी, तीनचाकी, चारचाकी आणि अन्य वाहनांचा समावेश आहे. पोलिसांनी कंटेन्मेंट झोनमध्ये 1 हजार 158 जणांवर कारवाई केली आहे.

बेकायदेशीररित्या नमाज आणि मिरवणुकीसाठी एकत्र आल्याप्रकरणी 4 गुन्हे दाखल केले आहेत. जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने विकणे, जीवनावश्यक वस्तू कायद्याचे उल्लंघन केल्याबाबत 13 गुन्हे दाखल केले आहेत.

बेकायदेशीर कामगार वाहतूक केल्याप्रकरणी 22 गुन्हे तर सोशल मीडियावर कोरोना काळात अफवा आणि चुकीची माहिती पसरविल्याबाबत 7 गुन्ह्यांची नोंद आहे.

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी 16 गुन्हे दाखल आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांनी लॉकडाऊन काळात 91 हजार 896 ई- पासेस दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.