Chinchwad : प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 82 जणांवर पोलिसांकडून कारवाई

0

एमपीसी न्यूज – प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आणखी 82 जणांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुरुवारी (दि. 21) कारवाई केली आहे.

पिंपरी चिंचवड शहर रेड झोनमधून वगळण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या नियमांमध्ये देखील शिथीलता आणली आहे. मात्र, सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर नागरिकांना संचारबंदीचे नियम लागू आहेत.

प्रशासनाने केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 82 नागरिकांवर पोलिसांनी कारवाई करीत गुन्हे दाखल केले आहेत.

पिंपरी महापालिकेने कोरोना संशयितांचे रिपोर्ट तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्यामध्ये शहरातील 102 जणांचे रिपोर्ट गुरुवारी निगेटीव्ह आले आहेत.

महापालिका रुग्णालयात 87 कोरोना सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, आजपर्यंत शहरातील 252 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 142 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

गुरुवारी (दि. 21) पिंपरी चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे भोसरी एमआयडीसी (12), भोसरी (5), पिंपरी (0), चिंचवड (9), निगडी (24), आळंदी (1), चाकण (4), दिघी (0), म्हाळुंगे चौकी (2), सांगवी (8), वाकड (2), हिंजवडी (7), देहूरोड (3), तळेगाव दाभाडे (1), तळेगाव एमआयडीसी (4), चिखली (0), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (0) अशी एकूण 82 जणांवर कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like