Chinchwad: वाल्हेकरवाडी ते भोंडवे कॉर्नर रस्त्यावर खड्डेच-खड्डे ! (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील वाल्हेकरवाडी ते भोंडवे कॉर्नर दरम्यानच्या रस्त्यावर सगळीकडे खड्डेच-खड्डे पडले आहेत. रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे नागरिकांसाह वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. शहरातील बहुतांशी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्डयामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. यामुळे अनेक अपघात झाले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळे खड्यांमध्ये भर पडत आहे. पावसामुळे बुजविलेले खड्डे परत उखडले जात आहेत.

वाल्हेकरवाडी ते भोंडवे कॉर्नर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सगळीकडे खड्डेच-खडे आहेत. रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. खड्यातून वाहन चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. पालिकेने हे खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

_PDL_ART_BTF

  

  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.