Chinchwad: शाहूनगरमध्ये दोन दिवसांनंतर वीजपुरवठा सुरु; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

Power supply resumes in Shahunagar after two days; Citizens had to endure heartache

एमपीसी न्यूज – चिंचवडच्या शाहूनगरधील वीजपुरवठा तब्बल दिवस बंद असल्याने स्थानिक नागरिकांना दोन दिवस अंधारात काढावे लागले. वीज नसल्याने उंच घरांमध्ये पाणी चढत नव्हते. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आज, शुक्रवारी दुपारी सव्वा बारा वाजता येथील वीजपुरवठा पूर्ववत झाला. 

पिंपरी-चिंचवड शहराला चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. बुधवारी दिवसभर जवळपास संपूर्ण शहरातील वीजपुरवठा बंद होता. वादळामुळे झाडपडीच्या मोठ्या घटना घडल्या. विजेच्या तारावार देखील झाडे पडली होती.

शाहूनगरधील वीज बुधवारी सायंकाळी पाच वाजता गेली होती. त्यानंतर वीज परत येण्यास दोन दिवसांचा कालावधी लागला. आज शुक्रवारी सकाळी सव्वाबारा वाजता या भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला.

यासंदर्भात शाहूनगरधील रहिवासी सुरेंद्र कुलकर्णी म्हणाले, बुधवारी सायंकाळी पाच वाजता वीज गेली. त्यादिवशी वीज वादळी वा-यामुळे बंद होती. हे आम्ही समजू शकतो.

परंतु, त्यानंतर वीज पुरवठा सुरु होण्यास दोन दिवसांचा कालावधी लागला. वीज पुरवठा का खंडित झाला, याचे नेमके कारण सुद्धा महावितरणने सांगितले नाही.

वीज नसल्याने पाणी देखील कमी दाबाने येत होते. परिणामी उंच घरांमध्ये पाणी चढले नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आज दुपारी सव्वाबारा वाजता वीज पुरवठा सुरु झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.