BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : शिवजयंतीनिमित्त प्रबोधनपर व्याख्यानमाला

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज समाजप्रबोधन पर्वानिमित्त शनिवार ते बुधवारपर्यंत प्रबोधन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. पहिले पुष्प प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांच्या ‘आई-राजमाता जिजाऊ’ या विषयावरील व्याख्यानाने गुंफण्यात येणार आहे.

चिंचवड, संभाजीनगर येथील कमलनयन बजाज शाळेजवळ प्रबोधन व्याख्यानमालेचे  शनिवारी सायंकाळी सात वाजता उद्घाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, आण्णा बनसोडे, महेश लांडगे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ  पवार, विरोधी पक्षनेते नाना काटे उपस्थित राहणार आहेत.

रविवार 16 फेब्रुवारी 2020 रोजी प्रसिद्ध लेखक डॉ. संजय कळमकर हे आनंदाच्या वाटा या विषयावर व्याख्यान देणार आहेत. 17 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ डॉ. योगेश गुर्जर यांचे ‘गोष्ट एका ह्रदयाची’ या विषयावर मार्गदर्शन होईल.

18 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध व्याख्याते अरूण घोडके हे ‘शिवरायांचे आठवावे रूप’ या विषयावर बोलणार असून 19  फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता शाहीर आलमगीर बागणीकर, सांगली यांच्या शौर्यगाथा शिवरायांची या शाहिरीने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केले आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like