BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : पिंपरी-चिंचवड सहपोलीस आयुक्त पदावर प्रकाश मुत्याल यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहपोलीस आयुक्त प्रशासन पदावर भारतीय पोलीस सेवेतील प्रकाश प्रभाकरराव मुत्याल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलीस महासंचालकांनी बुधवारी (दि. 11) दिले.

विशेष पोलीस महानिरीक्षक आणि मुख्य दक्षता अधिकारी महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ, मुंबई हे पद पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत 31 डिसेंबर 2019 पर्यंत वर्ग करण्यात आले आहे. तसेच हे पद पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सह पोलीस आयुक्त (प्रशासन) म्हणून तयार करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सध्या अस्तित्वात असलेले अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) हे पद अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) या पदामध्ये 31 डिसेंबर 2019 पर्यंत रूपांतरित करण्यात आले आहे. त्यानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3