BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच ध्यास घेतलेला चिंचवडचा प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  

एमपीसी न्यूज – ज्ञान हेच व्यक्तीचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे आणि असे ज्ञानसंपन्न विद्यार्थी घडवणे व त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास साधून उद्याचा सुसंस्कृत सामाजिक बांधिलकी जपणारा नागरिक तयार करण्याच्या ध्यासाने पिंपरी-चिंचवड या औद्योगिकनगरीत अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी वसलेली कमला एज्युकेशन सोसायटी संचालित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स अविरतपणे कार्य करीत आहे.

2006 साली प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून लावलेला हा शिक्षणाचा वेलू आज प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स व कॉम्प्युटर स्टडीज, प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, प्रतिभा कॉलेज ऑफ एज्युकेशन, प्रतिभा ज्युनियर कॉलेज, प्रतिभा इंटरनेशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, प्रतिभा स्कौल डेव्हलपमेंट सेंटर अशा विविध शिक्षण संस्थांच्या स्वरूपात एक वटवृक्ष झाला आहे. त्याचप्रमाणे काही अडचणींमुळे शिक्षणापासून दूर राहिलेल्या किंवा शिक्षण अर्धवट सोडून नोकरी पत्करावी लागली, अशा नागरिकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्‍त विद्यापीठाचे बहिस्थ केंद्र येथे सुरू केले आहे, तसेच नजिकच्या काळात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचेही बहिस्थ अभ्यास केंद्र येथे सुरू होत आहे.

प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स व कॉम्प्युटर स्टडीज (PCCCS) या बी श्रेणी नॅक मानांकित महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न बीए, बीबीए, बीबीए (सीए), बीबीए (आयबी), बी. कॉम., बीएस्सी., बी.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स), बीसीए (सायन्स) हे पदवी अभ्यासक्रम आणि एम.कॉम, एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) हे पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जातात. या शिवाय
राष्ट्रीय सेवा योजना, बहिःशाल शिक्षण, कमवा ब शिका योजना, विवेकवाहिनी या सारख्या अभ्यासेतर उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला उत्तेजन दिले जाते.

 

प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (PIBM) या बी+ श्रेणी नॅक मानांकित मध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) व महाराष्ट्र तंत्रशिक्षण संचालनालय (DTE) मान्यताप्राप्त एमबीए व एमसीए (व्यवस्थापन) हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न अभ्यासक्रम चालविले जातात. एमबीएच्या शाखेमध्ये HR, Finance, Marketing, Production & Operations, IT 4 International Business ही स्पेशलायझेशन्स उपलब्ध आहेत.

आगळ्या वेगळ्या इंडक्शन प्रोग्रॅमद्रारे (PIBN) च्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षामध्ये आपल्या शैक्षणिक करिअरचा आलेख उंचावत नेण्यासाठी प्रवृत्त केले जाते. विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानांद्वारे कार्पोरेट जगतात प्रवेश करताना आवश्यक अशा कोणत्या कौशल्यांनी युक्‍त असणे गरजेचे आहे हे तर विद्यार्थ्याना समजतेच शिवाय ‘कॉर्पोरेट वीक’ या सप्ताहांतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्‍तींचे अनुभव प्रत्यक्ष ऐकणे व त्यांच्याशी संवाद साधण्याचीही सुसंधी मिळते.

PIBM मध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच इंग्रजी संभाषण कौशल्य व सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंगचाही अंतर्भाव रोजच्या तासिकांमध्ये केलेला आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाबरोबरच कॉर्पोरेट जगतामध्ये आत्मविश्वासाने उभे राहण्याची ब उत्तम प्लेसमेंट मिळण्यासाठी सक्षम होण्याची गरजही पूर्ण होते. त्याचबरोबर OMT हे आऊटबाऊंड ट्रेनिंग ज्यामध्ये ट्रेकिंग, विविध मॅनेजमेंट गेम्सच्या माध्यमातून व्यबस्थापकीय कौशल्ये शिकणे हेही विद्यार्थ्यांना साध्य होते. विविध कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष भेटीद्वारे विद्यार्थी
कंपनीच्या कार्यपध्दतींची माहिती घेतात.

त्याचप्रमाणे व्यवस्थापनाचे धडे घेणा-या विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याकरीता येथे प्रोत्साहन दिले जाते व संपूर्ण मार्गदर्शन केले जाते. आतापर्यंत येथील विद्यार्थ्यानी 20 पेक्षा अधिक स्टार्टअप सुरू केलेले आहेत.

प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालय (PCOE) या शिक्षण महाविद्यालयामध्ये उद्याचे शिक्षक घडविण्याचे कार्य केले जाते. बी. एड. ची पदवी प्राप्त करीत असताना हे शिक्षक उद्याच्या विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल कसा करता येईल, याचेही मार्गदर्शन घेत असतात. योग कार्यशाळा, विविध शैक्षणिक प्रवाह, नवनवीन अध्यापन तंत्रे इ. विषयांवरील सेमिनार्स अशा अनेकविध माध्यमातून प्रत्यक्ष अनुभवाद्वारे अध्यापनविषयक ज्ञान अद्ययावत ठेवण्याची संधी या विद्याथी-शिक्षकांना उपलब्ध करून दिली जाते.

 
प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेज येथे CBSE संलग्नीत या इंग्रजी माध्यमाची व कनिष्ठ महाविद्यालयातून उद्याच्या भारताचे आधारस्तंभ बनू पहात आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या व्यक्‍तिमत्चावर आजूबाजूच्या परिस्थितीचा खूप मोठा प्रभाव पडतो. अशा वेळी त्यांच्यातील नकारात्मक प्रतिसाद ओळखून वेळीच उपाययोजना केल्यास या भावी पिढीच्या आशा-आकांक्षा कोमेजणार नाहीत हे
जाणून विविध माध्यमातून त्यांच्यात सकारात्मक बदल घडवण्याचे कार्य या शाळेत केले जाते. 

“प्रतिभा ज्युनिअर कॉलेज” द्वारे मध्ये इयत्ता अकरावीचे कला, वाणिज्य, शास्त्र आणि बायफोकल (कॉम्प्युटर सायन्स व बँकिंग) शाखेचे अभ्यासक्रम सुरु आहेत. तसेच “प्रतिभा स्कील डेव्हलपमेंट सेंटर तर्फे संगणक, इलेक्ट्रॉनिक्स आदी व्यावसायिक क्षेत्रातील व्यावसायिक प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रम पिंपरी चिंचवड मधील विद्यार्थ्येकरीता उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामध्ये ब्युटी पार्लर अॅण्ड फॅशन डिझायनींग, इलेक्ट्रिशियन, एसी अँण्ड रेफ्रिजरेशन दुरूस्ती, मोबाईल रिपेरींग इ. व्यावसायिक अभ्यासक्रम येथे शिकविले जातात. त्याद्वारे स्थानिक विद्यार्थ्यांना पारंपारिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक कौशल्य प्राप्त करण्याही संधी येथे मिळत आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्‍त विद्यापीठाचे बहिस्थ केंद्रात बी.ए. (मराठी/इंग्रजी माध्यम), बी. कॉम. (मराठी/इंग्रजी माध्यम), एम. कॉम. (इंग्रजी माध्यम), मानवी हक्क प्रमाणपत्र इ. अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तसेच बी. लीब. अँड आय.एस.सी., एम. ए., पत्रकारीता पदविका इ. अभ्यासक्रम प्रस्तावित आहेत.जॉय ऑफ गिव्हिंग वीक, रक्‍तदान शिबीर, वृध्दाश्रम, मतिमंदाची निवासी शाळा, अनाथाश्रम अशा ठिकाणी भेट देणे अशा उपक्रमांद्रारे विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी जपण्याचे शिक्षण दिले जाते.

प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स द्वारे दरवर्षी राज्यस्तरीय “प्रतिभा रोजगार मेळावा’ चिंचवड येथील शेक्षणिक संकुलात भरविला जातो. संपूर्ण महाराष्ट्रातील ब राज्याबाहेरील अंदाजे 10 ते 12 हजार उमेदवार, विविध क्षेत्रातील 100 ते 150 नामांकित कंपन्यांचा सहभाग आणि 8 ते 10 हजार नोकरीच्या संधी येथे उपलब्ध करून दिल्या जातात. दरवर्षी सुमारे 3500 उमेदवारांना या उपक्रमाद्वारे नवीन अथवा
अधिक चांगली नोकरीची संधी प्राप्त होते.

 
कमला एज्युकेशन सोसायटी संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा आणि विश्वस्त मंडळाच्या इतर सदस्यांच्या सहाय्याने गेली 15 वर्षांच्या अथक परिश्रमाने पिंपरी चिंचवड नगरीमध्ये जनतेकरीता सर्व सोईंनी युक्त असे आधुनिक असे “कमला एज्युकेशन संस्थेचे प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स द्वारे शैक्षणिक संकुल उभे केले आहे. या द्वारे पिपरी चिंचवड मधील नागरिकांना उत्तमोत्तम शैक्षणिक सुविधा व
पर्याय उभे करून दिल्या आहेत व आज ‘प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’चे नाव एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणून पिंपरी-चिंचवडमध्ये घेतले जात आहे.
या सर्व शाळा व महाविद्यालयात 6000 हून अधिक विद्यार्थी उत्कृष्ट शिक्षण घेत आहेत. औपचारिक शिक्षणाबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो. शिक्षणक्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याबाबत संस्था नेहमीच आघाडीवर असते.
 
प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स
कॅम्पस – ब्लॉक डी 3, प्लॉट नं. 3, मेहता हॉस्पिटलच्या मागे, मुंबई-पुणे महामार्गाजवळ, एमआयडीसी, चिंचवड, पुणे. पिन – 411019
दूरध्वनी (020) 30690509/11/12 फॅक्स – (020) 30690510, भ्रमणध्वनी क्रमांक – 8600100942, 8600100945 ईमेल – [email protected]. वेबसाईट – pratibhagroup.org.in
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3