Chinchwad : प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षिका डॉ. सुनीता पटनाईक यांना ‘पीएच.डी.’ प्रदान

Pratibha Junior College Teacher Dr. Sunita Patnaik Awarded 'PhD'

एमपीसी न्यूज – कमला एज्युकेशन संस्थेच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेज सायन्स विभागाच्या समन्वयक डॉ.सुनीता पटनाईक यांना नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्यावतीने ‘पीएच.डी.’ प्रदान करण्यात आली.

पटनाईक यांनी ‘अनॉलिटिकल अँड पायटोकेमिकल स्टडी ऑफ मेडिकल प्लॅन्टस युज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ लिव्हर सिरॉसिस ऍज पर चरक संहिता चिकित्सा’ या विषयावर शोधनिबंध सादर केला आहे. सोलापूर विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. डी. एन. मिश्रा यांनी पटनाईक यांना मार्गदर्शन केले.

प्रतिभा ग्रुप ऑफ एज्युकेशन संस्थेकडून डॉ . पटनाईक यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, प्रशासन अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे व सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.