Chinchwad : प्रतिभा ज्युनियर कॉलेजमध्ये 11 वी च्या विद्यार्थ्यांचे स्वागत

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील प्रतिभा ज्युनियर कॉलेजच्या इयत्ता 11वी च्या नवोगत विद्यार्थ्यांसाठी प्रा.रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी कमला एज्युकेशन संस्थेचे सचिव डॉ. दीपकजी शहा, डॉ. श्रीराम गीत, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेचे सहाय्यक सचिव डॉ. भाऊसाहेब कारेकर, स्वागताध्यक्ष व प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम व प्रतिभा ज्युनियर कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ. वनिता कुर्‍हाडे, अकरावीचे विद्यार्थी व पालक उपस्थियत होते.

डॉ.वनिता कुर्‍हाडे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेची ध्येय्य व उद्दीष्टे स्पष्ट करून प्रतिभा ज्युनियर कॉलेजच्या यशस्वी वाटचालीचा व विद्यार्थ्यांच्या यशस्वी कामगिरीचा गुणगौरव केला. मान्यवरांच्या हस्ते आदित्य बुक्की, अझर बायझन, प्रांजल बाबानगर, ओंकार भोर यांचा पालकासमवेत सत्कार करण्यात आला.

डॉ. दीपकजी शहा म्हणाले की, संपूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त आपल्या हातात असते. मनाची इच्छाशक्ती आपल्याला सक्षम बनवत असते.प्रचंड कष्ट करण्याची तयारी व जिद्द तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहचवते.

कार्यक्रमाचे नियोजन प्रा. स्नेहा भाटिया व त्यांच्या सहकार्‍यांनी केले. प्रास्ताविक प्रा. वैशाली देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. ब्रिजेश देशमुख यांनी तर प्रा.जास्मिन फराह यांनी आभार व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like