Chinchwad : प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Chinchwad) यांच्या मार्फत घेतल्या गेलेल्या इयत्ता बारावीच्या शैक्षणिक वर्ष 2022-23 परीक्षेत प्रतिभा ज्युनिअर कॉलेज, काळभोर नगर, चिंचवड मधील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले. सालाबादप्रमाणे या वर्षी ही प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान, वाणिज्य व कला शाखेचा निकाल 100  टक्के लागला.

विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ .बाबासाहेब सांगळे, प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी  कौतुक केले.

Pimpri : शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

विज्ञान शाखेतून सिद्धी सतीश पवार 91 टक्के गुण प्राप्त करुन प्रथम,सिमरन उदय सराफ  90.67 टक्के गुण प्राप्त करुन द्वितीय तर अथर्व अविनाश गोंघाडे 90 टक्के  गुण प्राप्त करुन तृतीय आले.

वाणिज्य शाखेतून विशाल सागर शेवाळे  94  टक्के गुण प्राप्त करुन प्रथम, फरहिन फिरोझ शेख 93.83 टक्के गुण प्राप्त करुन द्वितीय तर साहिल राजेंद्र माळी 91.17 गुण प्राप्त करुन तृतीय आले.

कला शाखेतून श्रेया राहूल पवार 94  टक्के गुण प्राप्त करुन प्रथम, महक रुपकुमार चौहान  91.33 टक्के गुण प्राप्त करुन द्वितीय तर अरुणकुमार शामकुमार आचारी 90  टक्के गुण प्राप्त करुन तृतीय आले. शहा आयुषी रविंद्र हिने अकाउंटन्सी या विषयात 100 गुण प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात (Chinchwad) आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.