Chinchwad : प्रयास ग्रुप चिंचवडतर्फे सफाई महिला कर्मचारी यांचा सन्मान

एमपीसी न्यूज – प्रयास ग्रुप महिलांचे खुले व्यासपीठ चिंचवडच्यावतीने “ सन्मान नारीचा “ महिला दिनानिमित्त ग्रुपतर्फे चिंचवड येथील सफाई महिला कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला.

सफाई महिलां कर्मचारी कविता रसाळ, सुनीता क्षीरसागर, मंगल रसाळ, कविता कसबे यांना साडी, हातमोजे, पादत्राणें व गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा उषा गर्भे होत्या. यावेळी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, फिजिओथेरेपीस्ट सुश्रीता तेरवांडकर, प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा शोभा निसळ, ग्रुपसदस्या रेखा क्षीरसागर, माधुरी कवी आदी उपस्थित होत्या.

उषा गर्भे यांनी अधुनिक काळांतील स्त्रिया त्यांची कर्तव्ये व जबाबदा-या याबद्दल महिलांना मार्गदर्शन केले. नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी चिंचवड येथील ओला कच-यांपासून तयार केलेल्या खतनिर्मितीचा प्रकल्प याची माहिती देऊंन व्यवस्थापनासंबधी सूचना दिल्या. सुश्रीता तेरवांडकर यांनी बदलत्यां काळातील स्त्रीचे अस्तित्व, तिची बदलणारी जीवनशैली व त्यासाठी आवश्यक असणारा योग व व्यायाम याचे महत्व सांगितले.

शोभा निसळ यांनी बॅलन्स फाॅर द चेंज ही संकल्पना विषद करून सांगितली. या प्रसंगी ग्रुपच्या सदस्यांनी विविध कला सादर केल्या. सविता कुलकर्णी यांनी ग्रुपविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन रेखा क्षीरसागर यांनी केले. आभार आशा पूरकर यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शैला वडापूरकर, आशा पूरकर, माधुरी कवी, गीतांजली बावळे, जयश्री उदास, दीपाली खासनीस, नंदा मोकाशी, साधना चव्हाण, निलीमा कांबळे, साधना चव्हाण स्नेहा सपगावकर, सुप्रिया खासनीस आदी महिलांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.