Chinchwad : नाटय संस्कार कला अकादमीच्या नाटयछटा स्पर्धेचे पारितोषिक वितरण

एमपीसी न्यूज – नाटय संस्कार कला अकादमीतर्फे घेण्यात आलेल्या दिवाकर स्मृती नाटयछटा स्पर्धेत शालेय गटात मिहिका बिराजदार, आत्मज सकुंडे, अन्वी बेलसरे, अनन्या भेगडे, शाम कुलकर्णी, हरीष पाटील यांनी तर खुल्या गटात प्रमिला धोंगडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेचे हे 28 वे वर्ष आहे.

पिंपरी चिंचवडमधील मधुश्री कलाविष्कार निगडी, आविष्कार बालभवन चिंचवड, भारतीय जैन संघटना विदयालय, संत तुकाराम नगर, पिंपरी आणि ब्ल्यु रीड्ज पब्लिक स्कूल, हिंजवडी या ४ केंद्रांत स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण 600च्यावर स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यातील 136 स्पर्धकांची अंतिमफेरी दि. 11 रोजी ज्ञान प्रबोधिनी नवनगर विदयालय, निगडी प्राधिकरण येथे घेण्यात आली.

  • या स्पर्धेचे पारितोषिक वितरण आज (दि. 12) आचर्य अत्रे रंगमंदिरात झाले. त्या नंतर पुणे विभाग व पिंपरी-चिंचवड विभागातील पहिल्या तीन परितोषिक विजेत्या स्पर्धकांचा महाअंतिम सोहळा झाला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि वनस्थळीच्या व्यवस्थापक कल्पना गुणाकी यांच्या हस्ते झाले.

  • नाट्य प्रशिक्षणामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढीस लागतो. पालक मुलांच्या पाठीशी आहेत ही कौतुकाची बाब असल्याचे भोईर म्हणाले. मावळ भागातही स्पर्धा घ्याव्यात, असे आवाहन गुणाकी यांनी केले.

हा सोहळा गेली 4 वर्ष पुण्यात होत होता. या वर्षी प्रथमच हा सोहळा पिंपरी चिंचवडमधील प्रेक्षकांच्या आग्रहास्तव पिंपरी येथे घेण्यात आल्याचे नाटय संस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी प्रास्ताविकात सांगितले.

नाटयछटा स्पर्धा २०१९ : पिंपरी-चिंचवड :  अंतिम फेरी निकाल (प्रथम, द्वितीय, तृतीय या क्रमाने)
शिशुगट : मिहिका बिराजदार, मनवा वैदय, सान्वी पत्की, उत्तेजनार्थ जिज्ञासा महाजन, गिरीजा शिर्के, वेद उंब्रजकर.१ली ते २री : आत्मज सकुंडे, शरण्या नवले, अरिषा कुंभार. उत्तेजनार्थ मानस अहिरराव, शुभ्रा मगर, पर्णवी गाडे.

  • 3 री ते 4 थी : अन्वी बेलसरे, ईश्वरी निकम, दर्शना मुजुमले, उत्तेजनार्थ अद्विता घार्गे. 5 वी ते 6वी : अनन्या भेगडे, सान्वी भाके, नीरजा पेंडसे, उत्तेजनार्थ मुक्ता देशमुख, सई शिरसकर, शाल्मली येळकर. 7 वी ते 8 वी : शाम कुलकर्णी, हिमानी पुराणिक, समीक्षा सुरवडकर, उत्तेजनार्थ वैष्णवी गटकुळ. 9 वी ते 10 वी : हरीष पाटील, अथर्व कुलकर्णी, ओम तळपे, उत्तेजनार्थ अनया फाटक.

खुला गट : प्रमिला धोंगडे, माधवी पोतदार, उत्तेजनार्थ मोनिका बोरसे. नाटयछटा लेखन स्पर्धा – शिक्षक लेखन : अनघा दीक्षित, निशा बेलसरे, प्रतिभा ढोकरे. पालक लेखन : माधवी पोतदार, अमृता देशमुख, मंजिरी भाके. विदयार्थी लेखन : शंतनू नातू.

  • सूत्रसंचालन सुरेखा कामथे यांनी केले. आभार माधुरी ओक यांनी मानले. परिक्षक म्हणून मिलिंद सबनीस, अनुराधा कुलकर्णी, राजश्री राजवाडे-काळे, दिपाली निरगुडकर, पुष्कर देशपांडे यांनी काम पहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.