Chinchwad : प्रा. सुषमा खंडाळे, प्रा. सुवर्णा गायकवाड यांना ‘पीएचडी’

एमपीसी न्यूज – प्रा. सुषमा खंडाळे, प्रा. सुवर्णा गायकवाड यांना ‘पीएचडी’ मिळाल्याबद्दल कमला शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

चिंचवड येथील कमला शिक्षण संस्था संचलित प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील प्रा. सुषमा खंडाळे यांना ‘स्टडी ऑफ इफेक्टिव्हनेस ऑफ कॉम्प्युटर असिस्टेड लँग्वेज लर्निंग प्रोग्राम ऑफ डेव्हलपिंग क्रिएटिव्ह रायटींग स्कील सेकेंडरी लेव्हल स्टुडन्ट ऑफ औरंगाबाद डिस्ट्रिक्ट’ या विषयावर औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातर्फे पीएचडी प्रदान करण्यात आली.

  • महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण मंडळाचे माजी संचालक डॉ. पी.आर. गायकवाड यांनी त्यांना मार्गदर्शन केले. तर, प्रा. सुवर्णा गायकवाड यांना ‘डेव्हलपमेंट ऑफ स्टॅडर्ड डायरेक्शन ऑफ सायंटीफिक ऍट्यट्युट स्केल’ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएचडी प्रदान करण्यात आली. त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शिक्षणशास्त्र व विस्तार विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संजीव सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. त्याबद्दल कमला शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते दोघींचाही शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. पोर्णिमा कदम, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. वनिता कुर्‍हाडे, ‘एमबीए’ महाविद्यालयाचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, महाविद्यालयाचे मुख्यप्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया यांच्या समवेत शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील शिक्षण घेत असलेले विद्यार्थिनी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

  • यावेळी डॉ. राजेंद्र कांकरीया व प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम यांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्तावना प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. पोर्णिमा कदम यांनी केली. सूत्रसंचालन ‘बीएड’ची विद्यार्थीनी उषा साकोरे यांनी तर आभार मीनल दरेकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.