Chinchwad : ‘प्रोटेक्ट शिल्ड फोर्स सिक्युरिटी’कडून पोलिसांना सुरक्षा साधनांचे वाटप

एमपीसी न्यूज – खासगी सुरक्षारक्षक पुराविणा-या प्रोटेक्ट शिल्ड फोर्स सिक्युरिटी एजन्सीकडून पोलिसांना सुरक्षा साधनांचे वाटप करण्यात आले. पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्रॅम अंतर्गत खासगी कंपन्यांचे सुरक्षारक्षक पोलिसांसोबत लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात करण्यात आलेल्या जिल्हाबंदीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात 65 चेकपोस्ट उभारण्यात आला आहेत. त्याचबरोबर अन्य विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. मात्र लॉकडाऊनची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी पोलिसांना मदत म्हणून खासगी कंपन्यांच्या सुरक्षारक्षकांनी स्वतःहून पोलिसांसोबत रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष काम करण्याचा निर्धार केला. त्याअंतर्गत अनेक सुरक्षा रक्षक रस्त्यावर उतरून पोलिसांना सहकार्य करीत आहेत.

पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही देखील आपली एक सामाजिक बांधिलकी आहे. त्यामुळे प्रोटेक्ट शिल्ड फोर्स सिक्युरिटी एजन्सीकडून अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना 200 लिटर सॅनिटायझर, एक हजार मास्क आणि दोन हजार पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रोटेक्ट शिल्ड फोर्स सिक्युरिटी एजन्सीचे अंकुश ढमढेरे आणि सर्व सहकारी उपस्थित होते.

श्रीकृष्ण एम्पायर हौसिंग तर्फे गरजुनां अन्नधान्य वाटप व ‘कोरोना’ जनजागृती अभियान
श्रीकृष्ण एम्पायर हौसिंग आणि श्रीकृष्ण एम्पायर रहिवासी संघ पूर्णानगर यांच्या वतीने व डॉ. कोमल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना विषाणू जनजागृती अभियान कार्यक्रम ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळत आज (शुक्रवारी) ठिकठिकाणी घेण्यात आला.

कोरोना आजारापासून बचाव करण्यासाठी सतत हात धुणे, तोंडाला मास्क लावणे, नाक, तोंड, चेहरा यांना सतत स्पर्श करू नये, बाहेरून घरात येण्याअगोदर सॅनिटायझर हाताला लावणे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गरजू व गरीब लोकांना धान्य वाटप करण्यात आले.

धान्य वाटपाचा उपक्रम राबविण्यासाठी सोसायटीमधील सर्व सभासदांकडून पैसे जमा करण्यात आले होते. या पैशातून 25 गरीब कुटुंबाला प्रत्येकी 5 किलो गहू, तांदूळ, तेल, साखर, डाळ आणि मसाला पॅकेट असे 15 दिवस पुरेल एवढे अन्नधान्य वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी श्रीकांत कदम, कुमार वाघमारे, किरण कांबळे, कडूबाळ शिंदे, चेअरमन महेश बारबंद, सेक्रेटरी अरुण भोसले, डॉ. कोमल कदम, डिमेळा, मितवा राठोड, सचिन जाधव यांनी केले. महेश मटकर, दत्तात्रय शेळके, प्रवीण आदोणे, आवटे, दिगंबर लढे, श्रीधरण, सौरभ जाधव यांचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.