Chinchwad : शिवसेना, राष्ट्रवादीच्या वतीने गोपीचंद पडळकरांचा निषेध

Protest of Gopichand Padalkar on behalf of Shiv Sena, NCP

एमपीसीन्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा किवळे विकासनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला.

शरद पवार हे लोकनेते असून त्यांच्या संसदीय कार्याला नुकतीच पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. अशा उत्तुंग नेत्यावर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या पडळकरांनी आपली योग्यता तपासावी. कारण पवार साहेबांच्या संसदीय कारकिर्दीएवढे पडळकरांचे वय तरी आहे काय, अशा शब्दात शिवसेनेच्या राजेंद्र तरस यांनी पडळकरांवर निशाणा साधला.

विकासनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हे आंदोलन करण्यात आले.

शिवसेनेचे राजेंद्र तरस, जयन नायर, सागर लोखंडे, सुनील चव्हाण, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे मजर खान, युवक सरचिटणीस नितीन जाधव, युवक संघटक सरफराज शेख, युवक संघटक मयूर थोरवे, विनोद येंबलर व महाविकासआघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like